इचलकरंजीतील मनसे खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी : रवी गोंदकर
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
आज महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने हे इचलकरंजी दौऱ्यावर असताना येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर कार्यालयात त्यांनी भेट दिली. मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शहराध्यक्ष रवी गोंदकर म्हणाले पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यापासूनच आम्ही धैर्यशील दादांच्या प्रचाराला लागलो आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत.
यावेळी मनसे हातकणंगले तालुका अध्यक्ष मा. दौलतराव पाटील, महिला गडी जिल्हा उपाध्यक्ष मा. स्मिता पवार, महिला आघाडी शहराध्यक्ष मा. रसिका साळुंखे हातकणंगले, मा. तालुका उपाध्यक्ष मा. शहाजी भोसले, इचलकरंजी शहरप्रमुख मा. रवी गोंदकर, मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष मा. विकास पुजारी, मा. मनोहर जोशी, मा. प्रतापराव पाटील, मा. नरेंद्र गोंदकर, मा. नितीन कटके, मा. महेश शेंडे, मा. योगेश दाभोळकर व मनसेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा