मनोज जरांगे पाटील यांची हेरवाडला धावती भेट

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी सोमवारी दुपारी हेरवाड येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच गावातील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

 यावेळी माहिती देताना मराठा समाजाचे पदाधिकारी भरत पवार म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात गावातील प्रत्येक मराठा तुमच्या मागे उभा असून यापुढेही तुम्ही द्याल तो आदेश आम्ही मानून समाजाच्या भवितव्यासाठी तुमच्यासोबत अखंडपणे राहण्याचा विश्वास दिला. एवढी मनोज जरांगे पाटील यांनी हेरवाड येथील मराठा समाज बांधवांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे हेरखाते असलेल्या ऐतिहासिक हेरवाड नगरीचे दर्शन झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

 यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष बंडू घोलप, भरत पवार, जितेंद्र देसाई, चव्हाण यांच्यासह मराठा समाज बांधव तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष