सत्यजित पाटील सरूडकरांच्या विजयासाठी प्रयत्न करा : गणपतराव पाटील

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

     विरोधकांनी केलेल्या आरोप प्रत्यारोप आणि टीकेकडे लक्ष देऊ नका प्रत्येक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा जाहीरनामा जनतेपर्यंत पोहोचवून उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांचे मशाल चिन्ह घराघरात सांगून त्यांच्या विजयासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांनी केले.

शिरोळ येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज मंदिरात महाविकास आघाडीचे नेतेमंडळी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले की देशात महाविकास आघाडीची सत्ता येणे गरजेचे आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनीच सत्यजित पाटील सरूडकर यांच्या विजयासाठी प्रत्येक मतदारांपर्यंत घराघरात जाऊन मशाल चिन्ह पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले 

माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात पोषक वातावरण आहे जनतेलाही परिवर्तन पाहिजे आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे कार्यकर्त्यांनी प्रचाराचे काटेकोरपणे नियोजन करून शहरातील सर्व घराघरात पोहोचून आपली भूमिका व मशाल चिन्ह सांगून सरूडकरांच्या विजयासाठी परिश्रम घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले. 

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष रणजितसिंह पाटील म्हणाले की हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकारला जनतेने हद्दपार करण्याचे ठरवले आहे त्यामुळे या निवडणुकीत सत्यजित पाटील सरुडकरांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्ते जीवाचे रान करतील शिरोळ तालुक्यातून त्यांना चांगले मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकरी चळवळीचे नेते यशवंत उर्फ बंटी देसाई यांनी मोदी सरकारंवर टीकेची जोड उडवत सर्वसामान्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे त्यामुळे प्रत्येकाने सत्यजित पाटील सरूडकर यांच्या विजयासाठी प्रयत्नशील राहावे असे सांगितले.

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून प्रचाराचे नियोजन सांगितले व शिरोळ शहरातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

दरोगाबा दूध संस्थेचे चेअरमन आप्पासो गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे , उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील,  श्री दत्त साखर कारखाना संचालक शेखर पाटील युवक कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे , रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव माने अमरसिंह शिंदे , आनंदराव माने - देशमुख , दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील - नरदेकर , अभिजीत माने , राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हा उपाध्यक्ष बी.जी माने , तालुकाध्यक्ष  विक्रमसिंह जगदाळे , रावसाहेब माने , माजी उपनगराध्यक्ष योगेश पुजारी , तातोबा पाटील , तुकाराम पाटील , फत्तेसिंह मोरे , बजरंग पुजारी , अवधूत उर्फ बाबाजी पाटील जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास गावडे,मानसिंगराव पाटील , शक्तीजीत गुरव , बाळासाहेब कोळी , बापूसाहेब गंगधर लियाकत सनदी बाबासाहेब पाटील नरदेकर परवेज मेस्त्री निलेश गावडे अभिजीत माने आयुब मेस्त्री उदय संकपाळ शिलेदार धोंडीराम दबडे सतीश चव्हाण रामचंद्र पाटील जब्बार मेस्त्री आयजाक भोरे आबा मोरे बाळासाहेब गावडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर संगमनगर येथे प्रचारफेरी काढण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष