केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा सर्वसामान्य जनतेला फटका : राजू शेट्टी

 


तारदाळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शेतकरी चळवळीने तरूणांना अन्यायाच्या विरोधात लढण्यास शिकविले या घामाच्या दामाच्या लढाईमुळे ग्रामीण भागातील अर्थकारण बदलले. यामुळे ग्रामीण भागातील समाज व्यवस्थेवर प्रभाव टाकणारे बदल शेतकरी चळवळीमुळे झाले. केंद्र व राज्य सरकार शहरी व ग्रामीण असा दुजाभाव करत वेगवेगळी धोरणे राबवित असून यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसत असल्याची टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी तारदाळ येथील जाहीर सभेत केले. 

     शेतीतील उत्पन्न वाढवायचे असेल तर त्यांना पायाभूत सुविधा , संशोधन केंद्रे , विमा सरंक्षण या गोष्टींची उपलब्धता करणे गरजेचे होते. देशामध्ये अन्नधान्य खाणारे दोन वर्ग आहेत एक चवीसाठी व दुसरा पोटाची खळगी भरण्यासाठी यामुळे जर देशात सेंद्रीय शेतीमुळे उत्पादन कमी झाले तर भुकबळीचे प्रमाण वाढेल. ५४३ खासदारांपैकी ३९० खासदार ग्रामीण भागातून येतात मात्र ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सरकारच्या विरोधात बोलण्याची कुणाची हिम्मत नाही. ईडी , सी. बी .आय ,इन्कमटॅक्स यांच्या दबावामुळे समाजाचे प्रश्न मांडले जात नाही आहेत. 

                राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता नसताना ८६ हजार कोटीचा चुराडा करून २७ हजार एकर जमीन यासाठी संपादित करून शेतक-यांना भु्मीहीन करत आहेत. तारदाळ परिसरात जमीनीचे दर दिड ते दोन कोटी रूपये एकर आहे मात्र शक्तीपीठ महामार्गात गेलेल्या जमीनींना कवडीमोल भाव मिळणार आहेत. यामुळे शक्तीपीठ मार्गासाठी एक इंचही जमीन संपादित करू देणार नाही. वेळ पडल्यास सरकारशी व अधिका-यांशी दोन हात करू. कराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेकडून वसुली करतात मात्र त्याचा परतावा उद्योगपींची कर्जे राईट ॲाफ करण्यासाठी केली जाते ही शोकांतीका आहे. सामान्यापर्यंतच्या योजना फक्त कागदावरच असून त्याची जाहीरातबाजी करण्यात येत आहे.देशामध्ये सर्वाधिक उद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या कृषी , वस्त्रोद्योग व औद्योगीक क्षेत्राकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष झाल्यानेच बेरोजगारी वाढू लागली आहे.यावेळी तालुकाध्यक्ष आप्पा एडके , राजेंद्र गड्ड्यानावर , पुरंदर पाटील , गुरूकुमार पाटील यांचेसह तारदाळ परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ ऊपस्थित होते.

टिप्पण्या

  1. 100 रुपये तर मिळाले नाहीत, आता तरी गंडवू नका, ह्या वर्षी तुमची सेटलमेंट झालीय, सगळीकडे माहिती आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष