डॉ. अतुल पाटील, पत्रकार चंद्रकांत भाट यांचा रोटरी हेरिटेज सिटीकडून सत्कार

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे कर्तव्यदक्ष सदस्य बालरोगतज्ञ डॉ अतुल पाटील यांना बसवभूषण आदर्श डॉक्टर व पत्रकार चंद्रकांत भाट यांना आत्मसन्मान गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्यावतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य व मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिकचे प्रमुख आणि वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात आदर्शवत कार्य करणारे प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ अतुल शिवाजीराव पाटील यांना बसव धर्मपीठ कुडल संगम ट्रस्ट, सदगुरु अल्लमप्रभू योगपीठ अल्लमगिरी आळते यांच्या वतीने बसवभूषण आदर्श डॉक्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे कार्यतत्पर सदस्य शिरोळ तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष पत्रकार चंद्रकांत भाट यांना संघर्ष नायक मीडिया ग्रुप स्वराज्य क्रांती पँथर आर्मी आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2024 कोल्हापूर यांच्या वतीने आत्मसन्मान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कार प्राप्त डॉ अतुल पाटील व पत्रकार चंद्रकांत भाट यांचा रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्यवतीने सत्कार करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे संस्थापक संजय पाटील सदस्य वेदमूर्ती अनिकेत जोशी महाराज यांच्या हस्ते डॉ पाटील व पत्रकार भाट यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जेष्ठ सदस्य पत्रकार आप्पालाल चिकोडे व मेजर प्रा काशिनाथ भोसले यांनी मनोगत व्यक्त करून दिल्या रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे यांनी स्वागत केले यावेळी सचिव तुकाराम पाटील ट्रेझरर संजय रामचंद्र शिंदे सदस्य राहुल यादव विवेक फल्ले विराजसिंह यादव यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष