शिरोळ तालुका शैक्षणिक मंच आयोजित ३० एप्रिलला सूर साधना गीतगायनाची मैफिल

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुका शैक्षणिक मंचच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील गीत गायनाची व संगीत साधनेची आवड असणाऱ्या शिक्षक बांधवांची कराओकेवर आधारीत सदाबहार गीतांची स्वर मैफिल मंगळवार दि.३० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता गिरीश सिनेमा हॉल,कुरुंदवाड येथे आयोजित करण्यात आली आहे.

     एकंदरीत ३० शिक्षकांचा सहभाग असून विविध प्रकारची मराठी,हिंदी गीतांचा समावेश आहे.  प्राथमिक शिक्षकांना शिक्षण प्रक्रियेत विविधांगी भूमिका वठवाव्या लागतात.शालेय कवितांना योग्य अशा चाली लावाव्या लागतात. मुलांचे शिक्षण आनंददायी होण्यासाठी अंगभूत असणाऱ्या कलांचा वापर करावा लागतात. शिक्षकांच्यातील उपजत गुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देश्याने सूर साधना स्वर मैफिल आयोजित केली आहे.तरी शिक्षकांच्यातील गायकांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष