शिरटीचे ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिर कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 शिरटी (ता शिरोळ) येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराच्या कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम होमहवन वास्तुशांती महाप्रसादाचे वाटप समाज प्रबोधनपर व्याख्यान असे कार्यक्रम उत्साहात पार पडले मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती या धार्मिक सोहळ्यामुळे गावात चैतन्यदायी व भक्तिमय वातावरणात निर्माण झाले आहे.

येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सर्वांच्या सहकार्याने करण्यात आला आहे श्री भैरेश्वर देवालयाचे काम पूर्णत्वास आले आहे यामुळे या मंदिराचा कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यास बुधवारपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे श्रीक्षेत्र आडी येथील श्री दत्त देवस्थान मठाचे प्रमुख परमाब्धिकार प पू परमात्मा महाराजांच्या दिव्य सानिध्यात मांगुरचे शाम भटजी यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा होत आहे.

श्री भैरेश्वर देवालयाच्या कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यानिमित्त दुसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता श्री भैरेश्वरास अभिषेक घालण्यात आला त्यानंतर कलश अभिषेक गणपती पूजन पुण्याहवचन मातृका पूजन मादी श्राद्ध ब्रह्म पीठ स्थापना रुद्र पीठ स्थापना मुख्य देवता स्थापना वास्तु पीठ स्थापना अग्नी स्थापना नवग्रह स्थापना वास्तुशांती होम हवन असे धार्मिक विधी कलश सवालधारक मानकरी पुजारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले या निमित्ताने दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यानिमित्त सकाळ संध्याकाळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. 

कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्याच्या निमित्ताने गावात शुभकार्य होत आहे यामुळे अनेक माहेरवाशीन लेकिंनी मंदिरासाठी गारवा आणला होता तो गारवा सोडून भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला विविध भागातील शेकडो माहेरवाशीण लेकी या धार्मिक सोहळ्यासाठी आपल्या माहेरी आल्या आहेत तसेच या धार्मिक सोहळ्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने विविध स्वरूपात मदत करीत आहे.

  सायंकाळी युवा कीर्तनकार सोपानदादा कनेरकर (महाराज) यांचे संस्कार या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान झाले त्यांनी सुजाण समाज घडवायचा असेल तर सुसंस्कारित पिढी घडवायला हवी यासाठी मार्गदर्शन केले यावेळी खानगोंडा पाटील जीवंधर चौगुले रामचंद्र पारदोळे बाळासो गवळी शशिकांत उदगांवे राजकुमार वारनोळे जावेद खतीब यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गावातील प्रमुख मानकरी विविध लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्या शुक्रवारी कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्याचा मुख्य दिवस यानिमित्ताने पहाटे साडेपाच वाजता श्री भैरेश्वरास अभिषेक घालण्यात येणार आहे यानंतर सकाळी दहा वाजता सर्व कलश पूजन व होमहावन होणार आहे दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांपासून कलश स्थापना सोहळा होणार आहे सायंकाळी सहा वाजता चल हवा येऊ द्या फेम वृषभ आकीवाटे त्यांचा हास्यगंध हा कार्यक्रम होणार आहे यावेळी धनाजी भोसले मनोज चौगुले प्रमोद माळी श्रीपती कुंभार शामराव गंगधर श्रेणिक मगदूम राजगोंडा पाटील आप्पा भोसले यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी गावातील प्रमुख मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

हा धार्मिक सोहळा पार पाडण्यासाठी श्री भैरेश्वर जीर्णोद्धार व कलशारोहण समिती श्री भैरेश्वर युवक यात्रा कमिटी ग्रामपंचायत शिरटी गावातील सर्व तरुण मंडळे विविध सहकारी सेवा संस्था मंदिराचे पुजारी गुरव बंधू यांच्यासह ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत या धार्मिक सोहळ्यानिमित्त भक्तिमय वातावरणाबरोबर गावात चैतन्य निर्माण झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष