खासदार धैर्यशील माने यांनी १००८ भगवान शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे घेतले दर्शन


 कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

आज हातकणंगले व पन्हाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या संवादासाठी जात असताना सकाळी पुलाची शिरोली येथे खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीतीत कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतले, त्याचबरोबर छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचबरोबर येथील समाज मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. येथील 1008 भगवान शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे दर्शन घेतले त्यानंतर माजी सरपंच मा. बाबासाहेब कांबळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. शेकडो कार्यकर्ये बैठकीस उपस्थित होते. त्यावरुन माजी आमदार मा. अमल महाडिक धैर्यशील माने यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांची मोट बांधली असल्याचे दिसून आले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना लोकसभा मतदारसंघातील कामांचा डोंगर पाहता एक ध्यास, एक विश्वास, एक प्रयास, म्हणून धैर्यशील माने यांना निवडून आणू या, आणि आपल्या गावातून दहा हजार पेक्षा जास्त मताधिक्य देऊया असे मत सरपंच कृष्णा करपे यांनी व्यक्त केलं. बैठकीनंतर मा. संजय पाटील, माळवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य मा. प्रकाश चौंदाडे, शिवाजीनगर यादववाडी येथील मा. बाबासो यादव, माजी सरपंच मा. अनिल शिरोळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

यावेळी माजी सरपंच मा. कृष्णा करपे, मा. राजेश पाटील, मा. सुरेश पाटील, मा. सतीश पाटील, उपसरपंच मा. अविनाश कोळी, राजाराम साखर कारखान्याचे संचालक मा. दिलीप पाटील, मा. दीपक यादव, मा. संदेश शिंदे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मा. विनायक यादव, मा. शिवाजी मोहिते, मा. संदीप तानवडे, मा. सचिन गायकवाड, मा. सागर चौंदाडे, मा. शिवाजी समुद्रे, मा. विजय जाधव, मा. श्रीकांत कांबळे, मा. बाळासाहेब पाटील, मा. अजित देशपांडे, मा. बाळासाहेब पुजारी, मा. बाबासाहेब बुधले, मा. प्रशांत कागले, मा. निवास कदम, मा. चंद्रकांत जाधव, मा. मनीष समुद्रे, मा. सचिन समुद्रे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष