साखर उद्योगासंदर्भात माधवराव घाटगे-मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा

'गुरुदत्त शुगर्स'चे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी 'गुरुदत्त'चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे आदी मान्यवर.


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता.२७) श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन साखर उद्योग संदर्भात सविस्तर चर्चा केली. सुमारे ४५ मिनिटे त्यांनी साखर उद्योगातील विविध धोरणांवर चर्चा केली. 

    मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केंद्र सरकार व राज्य सरकारने महाराष्ट्रातील साखर उद्योगाला पाठबळ देण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील साखर उद्योगाच्या विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन या उद्योगाला उर्जितअवस्था आणली. साखर उद्योगाला भरावा लागणारा दहा हजार कोटी रुपयांचा आयकर माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन साखर कारखानदारीला स्थिरता देण्याचा प्रयत्न केला. 

    तसेच साखर उद्योगासंदर्भात अनेक चांगले धोरणात्मक निर्णय घेऊन कारखानदारी टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील इंधनावर होणाऱ्या परकीय चलनामध्ये बचत करण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी म्हणून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच साखर उद्योगातील समस्या सोडवण्यासाठी निवडणूकीनंतर शिष्टमंडळाबरोबर चर्चेचे आश्वासन त्यांनी दिले. 

    यावेळी गुरुदत्त शुगर्स व घाटगे परिवाराच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत चेअरमन माधवराव घाटगे व एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे यांनी केले. यावेळी उदयोग मंत्री उदय सामंत, खास.धैर्यशिल माने, महादेव घुमे, प्रसन्न घुमे, ओंकार निकम, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष