संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या चार विद्यार्थ्यांची “मदरसन ऑटोमोटिव्ह टेकनॉलॉजिस अँड इंजिनीरिंग प्रायव्हेट लिमिटेड” मध्ये निवड.

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक इलेकट्रीकल इंजिनीरिंग विभागातील हर्षवर्धन पाटील, पंकज सूर्यवंशी, आणि मेकॅनिकल इंजिनीरिंगच्या प्रथमेश कांबळे, राजवर्धन बाले या चार विद्यार्थ्याची निवड “मदरसन ऑटोमोटिव्ह टेकनॉलॉजिस अँड इंजिनीरिंग प्रायव्हेट लिमिटेड” कंपनीमध्ये झाली आहे.

संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात. मदरसंन ऑटोमोटिव्ह टेकनॉलॉजिस अँड इंजिनीरिंग प्रायव्हेट लिमिटेड एक प्रख्यात कंपनी असून भारतभर तसेच विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रात या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे.

नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवडीसाठी इन्स्टिट्यूट ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. आशिष पाटील विभाग समन्वयक प्रा. आकाश घस्ते, संदीप पिंपळे यांचे सहकार्य लाभले.

या यशाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. विराट व्ही. गिरी, अकॅडमीक डीन व विभागप्रमुख प्रा. प्रशांत पाटील, प्रा. नितीन पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष