अरिहंत'कडून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास : गणपतराव पाटील यांचे मत
कुरुंदवाड येथे श्री अरिहंत को-ऑप सोसायटी शाखेचे उद्घाटन
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सहकारी संघ , सोसायट्यांची गरज असते. हे ओळखून सहकार नेते रावसाहेब पाटील यांनी गेल्या 34 वर्षापूर्वीच श्री अरिहंत संस्थेची स्थापना करून शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य केले आहे .आज 'अरिहंत' मुळेच शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळत असल्याचे मत शिरोळ येथील दत्त कारखान्याचे चेअरमन श्री गणपतराव पाटील यांनी व्यक्त केले.
श्री अरिहंत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव (मल्टीस्टेट) या संस्थेच्या कुरुंदवाड येथे शाखेचा विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त करताना कर्नाटका बरोबरच महाराष्ट्र राज्यातही शाखा विस्तारीला मंजुरी मिळवून जयसिंगपूर, गडहिंग्लज, सांगली, कुरुंदवाड या ठिकाणी शाखा प्रारंभ केली आहे. लवकरच आदमापूर ,इचलकरंजी, हुपरी या ठिकाणीही शाखांचे उद्घाटन होणार आहेत . अरिहंत सोसायटीच्या माध्यमातून आपण सभासदांसाठी विविध ठेवी योजना हाती घेतले आहे .या विविध योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा. विश्वासामुळे सहकार क्षेत्राची प्रगती होत असते आणि हा विश्वास आपण सार्थ ठरविले असल्याने सभासदांचा आपल्या संस्थेवर मोठा विश्वास असल्याचे शेवटी रावसाहेब पाटील यांनी सांगितले.
शाखा उद्घाटनाची औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या. अनेकांनी विविध ठेव योजनांचा लाभ घेऊन ठेव ठेविले.
श्री अभिजीत पाटील व सौ पद्मारानी पाटील यांच्या हस्ते धार्मिक विधिवत पूजा करण्यात आले. कार्यक्रमास युवा नेते उत्तम पाटील, कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील सौ मीनाक्षी पाटील, रावसाहेब पाटील, धनपाल आलासे ,दादासाहेब पाटील, बाळासाहेब देसाई ,जवाहर पाटील ,रामचंद्र मोहिते, रमेश भुजगडे ,अरुण आलासे ,प्रदीप पाटील, हर्षद बागवान ,इंद्रजीत पाटील ,देवराज मगदूम ,बाळासो नाईक, जीनाप्पा भबीरे,शरद आलासे ,अक्षय आलासे, संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, सीईओ अशोक बंकापुरे, यांच्यासह सर्व संचालक , मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा