गौरवाडला हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
गौरवाड येथील हनुमान मंदिरात भक्तीपुर्ण वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमासह श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला.
जन्मोत्सवानिमित्त सकाळी सहा वाजता मुर्तीवर अभिषेक करण्यात आला. यानतंर सात वाजता उपस्थित महिलावर्गानी हनुमान जन्माचा पाळणा गात जन्मोत्सव साजरा केला. यावेळी प्रसाद म्हणुन सुंटवडा वाटप करण्यात आले. सांयकाळी सात वाजता महाप्रसाद झाला.याचा हजारो भाविकानी लाभ घेतला. मंदिरासमोर रात्री आलास येथील रामकृष्ण भजनी मडंळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री उशिरापर्यंत भजन ऐकण्यास ग्रामस्थांची उपस्थिती होती. जन्मोत्सवानिमित्त हनुमान मंदिराला आकर्षक विद्यूत रोषणाई व मंदिरासमोर विविध रंगीबेरंगी रांगोळी घालण्यात आली होती. श्री हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर मंदिरात गर्दी होती.
मुर्तीची आख्यायिका :
येथील हनुमानाची मुर्ती ही वेगळ्या प्रकारची मुर्ती आहे.सुमारे पन्नास वर्षापुर्वी ही मुर्ती गावातील ग्रामस्थाना कृष्णा नदीकाठावर दिसुन आली.त्यावेळी लोंकानी ही दगडी मुर्ती उचलुन आणुन गावात तिची प्रतिष्ठापना केली. मुर्तीचे वैशिष्ठ म्हणजे इतरत्र जशी हनुमानाची मूर्ती असते तशी ती नाही.कारण मुर्तीमध्ये हनुमानाला भरदार मिशा आहेत.तसेच दोन्ही पायाच्या मध्ये एक छोटा असुर आहे.भली मोठी शेपुट आहे.अशा आकाराची मुर्ती सहसा कोठेही आढळत नाही.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा