बोरगांव येथील ज्योतिर्लिंग मंदिराला युवा नेते बसव प्रसाद जोल्ले यांनी दिली भेट

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

 बोरगांव शहरातील भाविकांचे श्रध्दास्थान देवस्थान श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग मंदिराला यात्रेनिमित्त आज बसवज्योती युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष ,युवा नेते बसवप्रसाद अण्णासाहेब जोल्ले यांनी भेट दिली.

   येथील ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देऊन 12 ज्योतिर्लिंग देवाचे दर्शन घेऊन सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना, मनोकामना व्यक्त केली.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भाजप नेते अजित कांबळे यांनी केले. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन बसव प्रसाद जोल्ले यांचा सत्कार करण्यात आला.

     यावेळी युवा नेते बसव प्रसाद जोल्ले म्हणाले,गेल्या 69 वर्षापासून कैलासवासी परमपूज शांत महाराज यांनी कर्नाटक महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग भक्तांना बोरगाव ची ओळख व देवाची महिमा यात्रेच्या माध्यमातून करून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत,श्रद्धा ,प्रामाणिकपणा व जागृत ही बोरगाव येथील ज्योतिर्लिंग देवाची खास महिमा आहे आणि हे जपण्याचे कार्य आज शांतानंद प्रसाद महाराज करीत आहेत .पुढील काळात खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नाने मंदिर जिर्णोद्धार व अन्य कामासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले .             

   शनिवार दिनांक 18 मे रोजी यात्रेला सुरुवात झाली. या दिवशी सकाळी श्री ज्योतिर्लिंग मंदिरातील ज्योतिर्लिंग देवास व श्री यमाई देवीस ,श्री काळभैरवनाथ व श्री पशुपतिनाथा सह मंदिरातील बारा ज्योतिर्लिंग आणि परमपूज्य शांत महाराजांची मूर्ती व समाधीस भक्तगणाकडून महाअभिषेक कऱण्यात आला.                                                 

     रविवारी 19 मे रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी सकाळी शांतानंद प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत श्री ज्योतिर्लिंग देवाची व परमपूज शांत महाराजांच्या पालखी व रथयात्रेला सुरवात होणार आहे. 

    यावेळी बोरगांव येथील मान्यवर व श्री गजानन महाराज गुरुजी शिवप्रतिष्ठान इचलकरंजी व हरिभक्त पंत श्री संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी व रथ यात्रेला सुरुवात होणार आहे. या रथयात्रेत बोरगांव सह कर्नाटक व महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग भक्त मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत .                                  

   या मिरवणुकीत दोन महान हाती, बारा घोडे, दोन ब्रास बँड कंपनी, भजनी मंडळ सह सीमा भागातील हजारोंच्या संख्येने भक्त मंडळींचा सहभाग लाभणार आहे. 

     यावेळी हालशिध्द नाथ साखर कारखाना संचालक ,नगरसेवक शरद जंगटे,रमेश मांलगावे,शिवाजी भोरे, उत्तम कदम,जितेंद्र पाटील, बाबासाहेब चौगुले,राजु हिरेमठ,देव माळी,शिशिर सातपुते,अमित माळी, शिसू एदमाळे,राजु लटलटे, गुंडा गोरवाडे,शिवाजी कदम, महादेव एदमाळे, भरत जंगटे, यात्रा कमिटीचे मुख्य व्यवस्थापक राजू ऊरूणकर ,बाळासाहेब ऊरूणकर, शातानंद प्रसाद महाराज,राजू नरवाडे, सुभाष नरवाडे ,पिंटू बेवनकट्टी, यांच्यासह भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. =

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष