खडकलाट येथे गुरुवार ते शनिवार आंबेडकर व बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
खडकलाट (ता. चिकोडी) येथील समस्त बौद्ध समाजबांधव व युवा मंडळातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भ.बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रम गुरुवार ता.२३ ते शनिवार ता.२५ अखेर विविध उपक्रमाने साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त पुढीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार ता.२३ व रोजी सकाळी ९ वा. डॉ.आंबेडकर चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पुण व भ.बुद्धांच्या प्रतिमेस फुले वाहुन सामुहिक अभिवादन कार्यक्रम. शुक्रवार ता.२४ रोजी दु.४ वा. डॉ.आंबेडकर चौक येथे सांगली येथील विचारवंत व प्रबोधनकार प्रा.सुकमार कांबळे यांच्या जाहिर सभेचा कार्यक्रम, रात्री चिपळूण येथील आंबेडकरी विचारांचा प्रबोधनात्मक जागर "वंदू बुद्धाला ,,," ऑर्केस्ट्रा कार्यक्रम. शनिवार ता.२५ रोजी दु.१२ वा. सह-भोजन तर सायंकाळी ४ वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भ.बुद्ध यांच्यासह अन्य समाज सुधारकांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक व चित्ररथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तेंव्हा या कार्यक्रमास खडकलाटसह परिसरातील आंबेडकरी अनुयायी व बहूजन समाजातील कार्यकर्त्यांनी मोठ्या स़ख्येंने उपस्थित रहावे असे अवाहन संयोजक डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भ. बुध्द संयुक्त जयंती समिती, सभा कार्यक्रम व प्रबोधनपर ऑर्केस्ट्रा कार्यक्रम समिती, आजी, माजी ग्रा.पं.सदस्य, क्रांती-भूमी खडकलाट येथील सर्व धम्मबंधु, उपासक, उपासीका व युवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा