"ज्योतिबाच्या नावानं चांगभलं" या मिरवणुकीतील गजराने बोरगांव ज्योतिर्लिंग यात्रा संपन्न

      


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

 सिमाभाग सह बोरगांव शहरातील भाविकांचे श्रध्दास्थानव आराध्य दैवत देवस्थान श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग देवाची यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.या यात्रा मिरवणुकीच्या पालखी व रथाचे उद्घाटन गावातील प्रमुख मान्यवर व श्री गजानन महाराज गुरुजी शिवप्रतिष्ठान इचलकरंजी व हरी भक्त श्री संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांनी केले.

   बोरगाव येथे सालाबाद प्रमाणे श्री ज्योतिर्लिंग देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते, चालु वर्षी यात्रेचे हे ,६९ वे वर्ष आहे.आज रविवार यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी बोरगांव येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थानचे प्रमुख शांतानंद प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत श्री शांत महाराज व ज्योतिर्लिंग देवाची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली या मध्ये दोन हत्ती,१२ घोडे,दोन ब्रास बँड,दोन रथ सह अनेक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली.या मध्ये कर्नाटक व महारष्ट्र तील भक्तांचा मोठा सहभाग होता.

  .काल शनिवार दिनांक 18 मे रोजी यात्रेला सुरुवात झाली. या दिवशी सकाळी श्री ज्योतिर्लिंग मंदिरातील ज्योतिर्लिंग देवास व श्री यमाई देवीस ,श्री काळभैरवनाथ व श्री पशुपतिनाथा सह मंदिरातील बारा ज्योतिर्लिंग आणि परमपूज्य शांत महाराजांची मूर्ती व समाधीस भक्तगणाकडून महाअभिषेक कऱण्यात आला. भक्तांच्या हाकेला ओ देणाऱ्या बोरगांव येथील श्री ज्योतिर्लिंग देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रेसाठी श्री शांतानंद, प्रसाद महाराज,भक्त मंडळी,गावातील युवक मंडळे , उस्तव कमिटीचे राजू उरणकर , बाळासाब उरणकर ,राजू नरवाडे, सुभाष नरवाडे,यांच्यासह भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते .                          

                    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष