गडहिंग्लज बार्देस्कर हॉस्पिटल यांचा तिसरा वर्धापन दिन साजरा

 


सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज मध्ये आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे बार्देस्कर हॉस्पिटल आज आपला तिसरा वर्धापन दिन साजरा केला. रविवार 26 मे रोजी पार पडलेल्या या वर्धापनदिनी रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. या तीन वर्षात रुग्णांना अनेक फायदा झाला आहे. बार्देस्कर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गडहिंग्लज येथे या तीन वर्षात महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पिवळा व केशरी रेशन कार्डधारकांना अँजिओग्राफी,एन्जोप्लास्टी,बायपास सर्जरी ,डायलेसिस, किडनी स्टोन, प्रोस्टेट ग्रंथी व इतर आजारावर मोफत उपचार केले आहेत गडहिंग्लज तालुक्यातील खेड्यापाड्यातील लोकांना खूप सोयीस्कर व चांगली सेवा मिळत असुन कमी खर्चात उपचार मिळाल्याने लोकांना खुप सोईस्कर म्हणून बार्देस्कर हॉस्पीटल कडे पाहत आहेत. डॉक्टर अनुप बारदेसकर, डॉक्टर मोतीराम, बारदेसकर, बाळासाहेब चव्हाण, मदन चौगुले, राहुल कांबळे, सागर लोखंडे, राहुल सोरटे, अजित फगरे विपुल तारदाळे आणि सर्व स्टाप उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष