ढोणेवाडी-बोरगाववाडी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. गीतांजली माने यांना राष्ट्रीय पातळीवरील आदर्श महिला सरपंच व समाज भूषण पुरस्कार जाहीर
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
ढोणेवाडी-बोरगाववाडी ग्राम पंचायत अध्यक्षा सौ गीतांजली विजय माने (वहिनी) यांना राष्ट्रीय पातळीवर मानाचा समाजाला जाणारा अंतर राष्ट्रीय "आदर्श सरपंच व समाज भूषण" पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.त्यांच्या या यशाचे पंचक्रोशीत गोड कौतुक केले जात आहे.
दिल्ली,कर्नाटक,महाराष्ट्र,गुजरात,गोवा राज्यांच्या सहभागाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या महाविद्यालयात कर्तव्यदक्ष भारतीय सैन्य दलातील अधिकारी,सिने कलाकार,शिक्षण अधिकारी,राजकीय नेते व माठाधिशांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार 26 मे 2024 रोजी गोवा येथे प्रदान करण्यात येणार आहे.
देश पातळीवर मानाचा समजला जाणारा व आंतरराष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा हा पुरस्कार म्हणजे विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह,मैसूर फेटा,चंदनाचा कायमस्वरूपी हार व भारत सरकारचे अभिनंदन पत्र आशा स्वरूपाचा आहे.
सरपंच सौ गीतांजली माने यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेहमी प्रामाणिक व आपल्या सामाजिक कार्याची घोडदौड सुरूच ठेवली आहे.प्रसंगी तन-मन-धन योगदानाने समाज सेवेचा वसा जोपासत समाजातील गरजू व गरीब लोकांना मदतीचा हात दिला आहे.शासकीय योजनेतून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.त्याच बरोबर ग्राम पंचायत सदस्या ते ग्रामपंचायत अध्यक्षा या राजकीय प्रवासात ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये भरीव विकास कामे केली आहेत.तर भविष्यात पाच पंचसूत्री शाश्वत कामे करण्याचा निर्धार केला आहे. .त्यामुळे त्यांच्या सत्य आणि प्रामाणिक कार्याची दखल घेत,त्यांना सन 2024 च्या राष्ट्रीय पातळीवरील "आदर्श सरपंच " पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.अल्पावधीतच त्यांच्या कार्याची व जनसेवेची दखल घेऊन हा मानाचा समजला जाणारा पुरस्कार देऊन ग्राम पंचायत अध्यक्षा सौ गीतांजली माने यांना जाहीर झाल्याने पुन्हा त्यांच्या कार्याला प्रेरणा, विकास कार्याला गती मिळाली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा