२६ वर्षानंतर शिवनाकवाडीत भरली शाळा ; १९९९च्या ७ वी बॅचचा गेट - टुगेदर संपन्न
शिवनाकवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :
विद्या मंदिर शिवनाकवाडी तालुका शिरोळ शाळेत सन १९९९ च्या इयत्ता सातवी बॅचमधील मुले -मुली एकत्र येवून गेट-टुगेदर कार्यक्रम संपन्न झाला.
सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यातून शाळेतील अनुभव सांगितले.सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच सदर कार्यक्रम आयोजित केल्यामुळे जुन्या मित्र मैत्रिणींना पुन्हा एकदा शाळेत विद्यार्थी म्हणून अनुभव घेता आला. आपल्या गुरुजनांसोबत हितगुज करण्याची संधी माजी विद्यार्थ्यांना घेता आली. या कार्यक्रमात मुलांच्यासाठी फणी गेम्स व इतर मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.सर्व शिक्षक -विद्यार्थ्यांनी एकत्रित सहभोजनाचा आनंद घेतला.
शाळेतील सर्व उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची आश्वासन मुख्याध्यापकांना सर्वांनी दिले. सदर कार्यक्रमांच्या आयोजनात डॉक्टर संतोष उमराणे,अर्चना बन्ने,मारुती पाटील,जिनगोंडा पाटील,सुदाम पाटील,सागर आरगे यांचे सह माजी विद्यार्थ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
या गेट-टुगेदर कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापिका श्रीमती प्रभावती रामचंद्र कोळी,रामचंद्र गणपती सूर्यवंशी,तात्यासो कृष्णाजी कुकडे,अशोक दादासो भुजवडकर,रामचंद्र दत्तात्रय ढेरे,बापूसाहेब भूपाल हावले,श्रीमती फरिदाबानु शहाजहान मणेरी त्यावेळचे वर्गशिक्षक शंकर अर्जुन वसवाडे, मुख्याध्यापक रामचंद्र लठ्ठे,सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा