जयसिंगपूर : लग्नाचा बनावट दस्त करून फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 लग्नाचा खोटा दस्त करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अमन अल्लाबक्ष सय्यद, अल्लाबक्ष सय्यद (दोघे रा. तिरंगा कॉलनी, कबनूर, ता. हातकणंगले) अशी संशयितांची नावे आहेत. केतनकुमार प्रकाश उमराणीया (वय ४५, रा. इंडस्ट्रीयल इस्टेट, वखार भाग, इचलकरंजी) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. जयसिंगपूर येथे ३० एप्रिल रोजी बनावट दस्त केल्याचा तक्रारदार यांचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, ३० एप्रिल रोजी दुपारी संशयितांनी संगनमत करून तक्रारदार यांची मुलगी दिया उमराणीया व संशयित अमन सय्यद याचे लग्नाचे खोटे करारपत्र करून अॅड. एच. एम. खान यांच्या जयसिंगपूर येथील कार्यालयात नोटरी तयार केली होती. त्या नोटरीचे करारपत्र खरे असल्याचे भासवून तक्रारदार यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष