कुरुंदवाड मध्ये इचलकरंजीच्या कृष्णा नळपाणी योजनेस मोठ्या प्रमाणात गळती ; अनेक दुकानात शिरले पाणी
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
वारंवार चर्चेच्या गर्तेत असणाऱ्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या कृष्णा पाणीपुरवठा योजनेस आज पुन्हा एकदा मोठया प्रमाणावर गळती लागली.हेरवाड मार्गावरील शिरढोण कॉर्नरला बस्तवाड येथून येणाऱ्या नळपाणी पुरवठा करणाऱ्या पाईनलाईनला मोठया प्रमाणावर गळती लागली.चक्क महेंद्र टायर वर्क दुकान गाळ्यातील कोबा केलेली सिमेंट काँक्रीटची जमीन व पत्रा उचकटला. त्याचबरोबर सना रेडियम दुकान गाळ्यामध्येही पाणी घुसल्याने देसाई यांची विहीर तुडुंब भरली.
महेंद्र व्हलकायनिंगमध्ये गळतीने भगदाड,खोक्याचा पत्रा उचकटला.हॉटेल मैत्री गार्डनमध्ये पाणीच पाणी झाल्याने सर्व साहित्य बाहेर काढण्याची तारांबळ उडाली.गॅस सिलिंडर, गॅस शेगडी,भांडी,मसाल्याचे पदार्थ,टेबले,खुर्च्या व इतर साहित्य बाहेर काढताना तारांबळ उडाली.सना रेडियम मध्येही पाणी घुसले.त्यामुळे तिन्ही दुकानांतील साहित्याचे व दुकान गाळ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
मोठया प्रमाणात गळती होवून पाणी वाहत होते.त्यामुळे शेतातील माती पाण्याबरोबर वाहून गेल्याने शेतीचेही नुकसान झाले आहे.मातीसह पाणी विहिरीत गेल्याने विहीर व शेती जलमय झाले होते. इचलकरंजी महापालिकेशी संपर्क साधल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र इचलकरंजीपर्यंतचे पाणी उलट बस्तवाडपर्यंत येत असल्याने उशिरापर्यंत पाणी येत होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा