भरधाव आयशरच्या धडकेत परप्रांतीय युवक ठार
हातकणंगले / शिवार न्यूज नेटवर्क :
भरधाव आयशरने धडक दिल्याने परप्रांतीय पादचारी मजूर जागीच ठार झाला. शुभमसिंग सुभाषसिंग राजभर ( वय १९, रा. बीरनौ, ता. बीरनौ, जि. गाजीपुर, उत्तर प्रदेश, सद्या रा. नागाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ) असे त्याचे नाव आहे. शिरोली एमआयडीसी येथील श्रीराम टायर समोर सेवा मार्गावर रविवारी ( ता. १९ ) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : शुभमसिंग व त्याचे अन्य तिघे साथीदार हे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत हेल्परचे काम करतात. रविवारी सायंकाळी कंपनीतील काम आटोपून ते पायी नागाव येथे रहात असलेल्या खोलीकडे निघाले होते. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील श्रीराम टायर समोर सेवा मार्गावर चालत असताना मागून भरधाव वेगाने येणार्या मालवाहतूक आयशर टेम्पोने ( एम एच ०९ एल ३३८९ ) शुभमसिंगला धडक दिली. या धडकेत शुभमसिंग रस्त्यावर पडला. आयशर टेम्पोची दोन चाके त्याच्या पोटावरुन गेली. यामध्ये तो जागीच ठार झाला. त्याच्या सोबत असणाऱ्या अन्य सहकार्यानी स्वतःला वाचविण्यासाठी सेवा मार्गाच्या डाव्या बाजूला धाव घेतली. पण पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू असल्याने तेथे खोदलेल्या खड्ड्यात ते पडले. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा