संभाजीपुरात ट्रकच्या धडकेत इसमाचा मृत्यू
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
संभाजीपूर (ता शिरोळ) येथील शिरोळ - कोल्हापूर बायपास रोडवर समर्थ ऑटो गॅरेज समोर ट्रकने समोरून जोराची धडक दिल्याने पादचारी अशोक भास्कर पवार वय 42 वर्षे ( सध्या रा. संभाजीपुर मुळगाव तावशीगड ता. लोहारा जि. धाराशिव) याचा मृत्यू झाला ही घटना रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघाताची फिर्याद गोविंद नागाप्पा भांडेकर ( रा संभाजीपूर) यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली असून अपघातातील ट्रकचालक तोसिफ सरदार जमादार (रा.कक्कमेली ता. सिंदगी जि. विजापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रकचालक तोसिफ जमादार हा आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक के ए 23 डी 6026 ही घेऊन चौंडेश्वर फाट्याहून भरधाव वेगाने नांदणी नाका जयसिंगपूर कडे येत असताना संभाजीपूर येथील समर्थ ऑटो गॅरेज समोर रस्त्यावरून अशोक पवार हे रस्ता ओलांडत असताना जमादार याने ट्रक निष्काळजीपणे चालवत भरधाव वेगाने येऊन त्यांना जोराची धडक दिल्याने अशोक पवार हे रस्त्यावर खाली पडून त्यांच्या डोकीला व पाठीला गंभीर इजा झाली पवार यांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात नेले असतात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले यामुळे ट्रकचालक तोसिफ जमादार याचे विरोधात भरधाव वेगाने ट्रक चालवून हायगयीने अविचाराने निष्काजीपणे आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्ता पास करणाऱ्या पादाचारी अशोक पवार यांना जोराची धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक फौजदार सरनाईक हे करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा