गौरवाडसह परिसराला वादळी पावसाचा तडाखा

अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

मंगळवारी सांयकाळी सात नतंर अचानक झालेल्या जोरदार वार्‍यासह वादळी पावसाने गौरवाडसह औरवाड,आलास,बुबनाळ,कवठेगुलंद,शेडशाळ,गणेशवाडी परिसराला सुमारे अर्धा तास जोरदार तडाखा दिला.यामुळे सखल भागातुन पाणीच पाणी झाले. तर वीजपुरवठा बराच वेळ खंडीत झाला होता.

गौरवाडसह परिसरात सांयकाळी पावणेसातला जोरदार वादळी वारे सुटले.वार्‍याचा वेग इतका होता की अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडली.तसेच गौरवाडमध्ये दत्तात्रय जासुद यांचे घरबांधकामाचे साहित्य ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेले पत्र्याचे शेड पडले.तर त्याची पत्रे इतस्ततः उडुन गेली.शेडमधील साहित्याचे नुकसान झाले. तसेच वार्‍यामुळे याच भागातील काही विजेचे खांब वाकली आहेत.तर औरवाड- कवठेगुलंद रस्त्यावर काही ठिकाणी झाडे उन्मळुन पडली आहेत. परिणामी वीजपुरवठा बराच वेळ खंडीत करण्यात आला होता.

      वार्‍याचा वेग इतका जोरदार होता की,रस्त्यावरुन जाणार्‍या चारचाकी वाहन चालकांनाआपली वाहने काही काळ संथगतीने चालवावी लागली तर काहीनी रस्त्याकडेलाच वाहने थांबवली. दुचाकी वाहनचालकांना तर काही क्षण आपण गाडीबरोबरच उडुन जातो की काय असे वाटले होते.

     वादळी वार्‍यासह धडकी भरवणारा विजांचा कडकडाट सुरु झाला.यामुळे आसमंत दणाणुन गेला.थोड्याच वेळात पावसाने आडवा-तिडवा मारा केला.पावसाचा मारा इतका जोरदार होता की ,अनेकांच्या घरी कौलातुन ,दारा-खिडकीतुन पाणी घरात शिरले.यामुळे घरात सर्वत्र पाणीच पाणी झाले.हे पाणी निर्गत करताना गृहिंणीची तारांबळ उडाली.   अर्धा तासच पाऊस झाला मात्र तो असा पडला की काही सेंकदातच गटारी भरुन वाहु लागल्या.तर सखल भागातुन पाणीच पाणी झाले.हा पाऊस सर्वच पिकांना लाभदायक असल्याने शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष