बोरगाव येथील बिरदेव देवाच्या यात्रेला २७ मे पासून होणार सुरुवात

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

    बोरगाव येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत व नवसाला पावणारे श्री बिरदेव देवाची यात्रा २७ ते २९ मे अखेर मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २७ रोजी पहाटे बिरदेव जन्मकाळ होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद वाटप कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी वालंग कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी श्री सिद्धेश्वर पालखी बोरगाव, श्री बिरेश्वर पालखी वडगोल व बिरदेव पालखी बोरगाव या पालखीचे भव्य आगमन होणार आहे. रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे. २८ रोजी सकाळी भव्य पालखी मिरवणूक होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. रात्री बिरलिंगेश्वर नाट्यसंघाचे पौराणिक नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. २९ रोजी पालखी भेटीचा कार्यक्रम होणार आहे. पालखी भेटीच्या कार्यक्रमानंतर यात्रेची सांगता होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ भक्तांनी घेण्याचे आवाहन समस्त पुजारी ,धनगर समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष