मुरगूड बातमीदारास मारहानिच्या निषेधार्थ निपाणी तालुका पत्रकार संघ यांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

    सीमाभागातील मुरगूड (ता. कागल) येथील सकाळचे बातमीदार प्रकाश तिराळे याना मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आहे. या घटनेचा निषेध करून निपाणी तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन पाठविले. महाराष्ट्र शासनाने दोषींवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. येथील पत्रकारांनी तहसीलदार एम. एन बळीगार यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द केले. तहसीलदार बडेकर यांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरच निवेदन महाराष्ट्र शासनाला पाठवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी झालेल्या बैठकीत कुर्ली येथील दैनिक तरूण भारतचे दिवंगत पत्रकार टि. के जगदेव यांना पत्रकार संघाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.

             यावेळी निपाणी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर पाटील, उपाध्यक्ष अनिल नवाळे, सचिव सोमनाथ खोत, पत्रकार राजेश शेडगे, विठ्ठल केसरकर, अमर गुरव, गौतम जाधव, सुनिल गिरी, राहूल मेस्त्री, सुनिल वारके, अश्विन अम्मनगी सह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष