असाही एक अनोखा विमानातील लग्नाचा ३५ वा वाढदिवस..

 


चिकोडी / शिवार न्यूज नेटवर्क :

वाढदिवस, लग्न वाढदिवस, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळे उपक्रम घेऊन साजरा केला जातो. पण सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम आणि त्यांची धर्मपत्नी सौ सीमा कदम यांनी आपला 35 वा लग्न वाढदिवस चक्क विमानात साजरा केला. यासाठी त्यांनी कोल्हापूर ते मुंबई असा आपल्या लग्न वाढदिवसाच्या दिवशी विमान प्रवास करून एक अनोखा असा लग्न वाढदिवस आकाशात स्वच्छंद भरारी मारताना साजरा केला . यातून त्यांनी आपल्या धकाधकीचे जीवन सोडून आनंदी जीवन कसे जगावे हा एक क्षण त्यांनी सर्वांसमोर ठेवून, आपले जीवन आपणच सुखी कसे करावे त्याचा त्यांनी मूलमंत्रच जणू समाजाला दिला आहे.

 जीवन जगत असताना सुख आणि दुख यातून पुढे जाऊन जीवन कसे सुखी करावे यासाठी आनंदी कशी जगावे त्यासाठी त्यांनी आकाशात भरारी मारून साजरा केलेला लग्न वाढदिवस खरोखरच कौतुकास्पद आणि अभिनंदन या आहे.

यापूर्वी त्यांनी वृद्धाश्रम ,अनाथ आश्रम ,इतर सामाजिक संस्था. या ठिकाणी आपला लग्न वाढदिवस साजरा केला आहे आणि इतर समाजातील एकाकी आणि दुःखी जीवन जगणाऱ्यांना आनंदाचा क्षण उपलब्ध करून दिला आहे. परंतु एका अनोख्या पद्धतीने जीवनातील काही क्षणाचा आनंद घेणे हा जो काही आगळावेगळा छंद आहे. तो त्यानी या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्याचा प्रयत्न केला आहे.

 आज धकाधकीच्या जीवनात माणसाला मनसोक्त आनंद घेऊन जीवन जगणे अशक्य झाले आहे अशा धकाधकीच्या जीवनात ही आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो हे या उपक्रमातून त्यांनी सर्वांसमोर ठेवला आहे.

आणि खरोखरच ही कौतुकाची बाब मानावी लागेल. मानवी जीवन जगत असताना दुःखाचा सामना करावा आणि त्यातूनच आनंद शोधावा हेच जणू काही या उपक्रमातून त्यांनी समाजाला संदेश दिला आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष