हेरवाड येथील पाणंद रस्ते जलदगतीने करा : बंडू बरगाले यांची मागणी

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड गावासाठी सुमारे १ कोटी रुपये खर्चाची पाणंद रस्ते मंजूर झालेली आहेत. मात्र, ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे सदरचे पाणंद रस्ते अपूर्ण अथवा अद्यापही करण्यात आलेली नाहीत. तोंडावर मान्सून आला असून पावसाळा सुरू झाला तर सदरचे रस्ते करता येणार नाहीत आणि याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे त्यामुळे हेरवाड हद्दीतील ठीक - ठिकाणी मंजूर असणारी पाणंद रस्ते तातडीने करण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले यांनी केली आहे.

 याबाबत माहिती देताना ते म्हणाले, शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून हेरवाड गावचा विकास साधला जात आहे. याच विकास फंडातून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आमदार यड्रावकर यांनी सुमारे १ कोटी रुपयांचे पाणंद रस्ते मंजूर केलेले आहेत मात्र, संबंधित ठेकेदाराकडून या पाणंद रस्त्याच्या कामासाठी चालढकल होत आहे. जून महिन्यात मान्सून दाखल होणार असल्याने सदरचे पाणंद रस्ते रखडले तर शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे तातडीने सदरचे रस्ते पूर्ण करण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष