हेरवाड हायस्कूलच्या दहावीचा निकाल ९८.९१%
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
साने गुरुजी शिक्षण संस्था संचलित हेरवाड हायस्कूल हेरवाड चा इयत्ता दहावीचा निकाल ९८.९१% इतका लागला.प्रथम क्रमांक कुमारी अनुष्का अरुणकुमार पाटील हिने ९६.६०%, द्वितीय क्रमांक कुमारी लक्ष्मी राजेंद्र सोलापुरे हिने ९४.६०% तर तृतीय क्रमांक कुमारी मानसी भारत घाटे हिने ९२.२०% पटकावला.एकुण ९२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते.त्यापैकी ९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष प्राविण्य ४१,प्रथम श्रेणीत ३१, द्वितीय श्रेणीत १७ तर पास श्रेणीत ०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ दा.आ.पाटील, उपाध्यक्ष प्रभाकर कनवाडकर,सचीव अजीत पाटील व सर्व संचालक यांचे प्रोत्साहन तर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माणिक नागावे,सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन व शिक्षकेतर कर्मचारी , पालकांचे सहकार्य लाभले.सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा