श्री हालसिद्धनाथ साखर कारखाना वतीने शेतकरी यांना टनेज साखरेचे वितरण व अपघातात मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना विमा रक्कमेचे वाटप

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

निपाणी येथील श्री हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे सर्वेसर्वा , चिकोडी लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री. अण्णासाहेब जोल्ले व कर्नाटक राज्य माजी मंत्री व निपाणी विधानसभेचे आमदार सौ. शशिकला जोल्ले वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ यांनी घेतलेल्या निर्णयानुसार सन 2023-24 या सालाचा ऊस गळीत हंगामात शेतकऱ्याकडून ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति टन (टनेज) ऊसास 500 ग्रॅम ( अर्धा किलो ) साखर रु 16/- प्रति किलो या सवलतीच्या दराने शनिवार दिनांक 01/06/2024 पासून साखर वाटप करण्यात येत आहे. सदर टनेज साखर विक्रिचे मुदत दिनांक: 01/06/2024 पासून 30/11/2024 पर्यंत आहे. तरी संबंधित सभासद व शेतकरी यांनी या मुदतीत आपली टनेज साखर कारखान्याच्या कामकाज कालावधीत घेऊन जावे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन श्री एम. पी. पाटील यांनी दिली.

    या अधूनिकरणात माणसाचे जीवन धावपळीचे बनले आहे. त्याकरण दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी कारखाना तर्फे दिनांक 11/04/2024 रोजी रस्ते अपघातात प्राण गमावलेले कारखान्याच्या तांत्रिक विभागाचे कामगार श्री. नागेंद्र महादेव तराळ यांच्या कुटुंबियांना जीव विमा रु. 10 लाख रुपये चेक वाटप व कारखान्याचे कार्यालयीन कर्मचारी श्री विनोद आत्माराम शेडगे हे दिनांक: 19/02/2024 रोजी आजाराने निधन झालेले आहे यांच्या कुटुंबियांना जीव विमा 10 लाख रुपये अनुदान सन्माननीय जोल्ले आण्णा व वहिनी यांच्या प्रयत्नाने देण्यात आले आहे.

            त्याशिवाय खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले व आमदार सौ. शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नाने कारखान्याच्या प्रत्येक कर्मचारी यांची काळजी घेत त्यांना जीव विमा 10 लाख रुपये व आपघाती विमा 10 लाख रुपये व आरोग्य विमा 2 लाख रुपये विमा सुविधा देण्यात येत आहे. ह्या विमा सवलती मुळे कामगार कुटुंबियांना आर्थिक मदत होते. त्याचप्रमाणे कारखान्याच्या प्रत्येक सभासदांना सुद्धा रु.5 लाख प्रमाणे अपघाती विमा सौरक्षण व सुविधा दिल्यामुळे या कार्यक्रम दरम्यान मा. अण्णासाहेब जोल्ले व सौ. शशिकला जोल्ले यांचे कृतज्ञता, जाहीर आभार व्यक्त केले. *. यावेळी श्री हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखाना चे अध्यक्ष एम पी पाटील,उपाध्यक्ष पवन पाटील,संचालक रामगोंडा पाटील सह सर्व संचालक मंडळ,कारखान्याचे शि ई ओ, सर, कर्मचारी,शेतकरी सभासद मोठया प्रमाणात उपस्थीत होते.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष