व्हॉइस ऑफ मीडियाच्या नाशिक अधिवेशनात शैक्षणिक साहित्य वाटपाचा राज्यस्तरीय शुभारंभ

 


नाशिक / शिवार न्यूज नेटवर्क :

येथील स्पोर्ट्स हॉल, गरुड झेप अकॅडमी, गंगापूर रोड येथे देशातील सर्वाधिक पत्रकार सदस्य असलेल्या वाईस ऑफ मीडिया च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशनात राज्यातील पत्रकारांच्या पाल्यांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्य वितरण सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे. वाईस ऑफ मीडिया तर्फे गेल्यावर्षी ७५० तर यावर्षी राज्यातील १२५० पत्रकार पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचेआयोजन करण्यात आले आहे.

 दि. 25 मे रोजी होणाऱ्या या अधिवेशनात नवी दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे हे प्रमुख वक्ते असून तेच या अधिवेशनाचे उद्घाटन करणार आहेत. वाईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे हे कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी असतील तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, डॉ. श्रीकांत सोनवणे हे उपस्थित राहणार आहेत. 

अधिवेशन यशस्वीतेसाठी विविध समित्या कार्यरत झालेल्या असून व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष कुमार कडलक कार्याध्यक्ष डॉक्टर धर्मेंद्र मुल्हेरकर, सरचिटणीस देवानंद बैरागी, महानगर कार्याध्यक्ष मायकल खरात,सुधीर उमराळकर, प्रमोद दंडगव्हाण, विठ्ठल भाडमुखे, नितीन ओसवाल, अविनाश शिंदे, सुनिता पाटील, रूपाली अहिरे तसेच जिल्हा कार्यकारिणीचे व महानगर कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. 

अधिवेशनात प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत सोनवणे यांनी संपादित केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन, नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार, पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार, उत्कृष्ट पत्रकारांना पुरस्कार आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

अधिवेशनासाठी उत्तर महाराष्ट्रातील सुमारे 400 ते 500 पत्रकार उपस्थित राहतील असा विश्वास वाईस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ,उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख दिगंबर महाले, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाटील , यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष