दिलिपराव माने, अशोकराव टारे यांना शिरोळ भूषण पुरस्कार जाहीर

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 येथील दलितमित्र डॉ. आशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान व शिरोळ नगरपरिषद यांच्या वतीने देण्यात येणारा शिरोळ भूषण पुरस्कार रेणूका भक्त मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव माने आणि उद्योगपती अशोकराव टारे यांना देण्यात येणार असुन आदर्शमाता पुरस्कार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मातोश्री रत्नाबाई शेट्टी यांना देण्यात येणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी दिली. दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १ जून २०२ ४ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवाजी चौकात शिरोळ भूषण पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व माजी मंत्री आमदार डॉ. विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, मा.आमदार अमल महाडिक, दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील, माजी खा. राजू शेट्टी, गुरुदत्त चे चेअरमन माधवराव घाटगे, माजी आ. सुरेश हाळवणकर, माजी आ. उल्हास पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. तसेच उल्लेखनीय कार्य केलेल्या रेखा अमर पाटील - मलीकवाडे यांचाही सत्कार या सोहळ्यात होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर प्रसिद्ध महिला कीर्तनकार हभप रुपालीताई सवणे (परभणी)यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे .

         यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय खातेदार, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दत्तचे संचालक अनिलराव यादव, पृथ्वीराज यादव, माजी सरपंच शिवाजीराव माने देशमुख, बजरंग काळे, प्रसाद खोबरे, धनंजय टारे, सुहास राजमाने, सुनील इनामदार, बबन बन्ने, सागर कोळी यांच्यासह पुरस्कार निवड समितीचे सदस्य व माने सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष