शिरढोण मधील पैलवान कृष्णा सासणे(आबा) यांचे १०२ वर्षात पदार्पण

  


हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरढोण मधील कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवान कृष्णा राऊ सासणे (आबा) यांनी आपल्या जीवनातील १०१ वर्षे पूर्ण करीत १०२ वर्षात पदार्पण केले.कृष्णा सासणे (आबा) यांचा जन्म २१/०५/१९२३ मध्ये झाला.लहान पणा पासून मच्छिमारी करत उदरनिर्वाह करीत कुटुंबातील ४ भावांचा सांभाळ केले.कुस्ती क्षेत्रात अलौकीक कामगिरी करत जीवनाचा प्रवास उत्तमरीत्या उभवगत येऊन सर्व मुलांना, नातवंडांना,परतुड्यांना यांचे शैक्षणिक कार्यरत पुर्ण करुन आज रोजी रियल सेटल जीवन १०१ वर्ष उभवगत आहेत.तसेच आज रोजी शिरढोण मधील एक जाणकार,विज्ञासु, अभ्यासु व्यक्तीमत्व गावातील व समाजातील न्याय प्रतिनिधी न्यायाच्या बाबतीत मात्र योग्य न्याय देणारे प्रतिनिधीत्व अशी त्यांची शिरढोण मध्ये ओळख आहे.गावांच्या विकासासाठी विविध संस्थेमध्ये त्यांनी चेअरमन,व्हा.चेअरमन, संचालक  म्हणून यांनी कार्यरत होते.सर्वसाधारण त्यांच्या कुटुंबांमध्ये १३५ लोकांचे मनुष्यबळ असलेली आणि एकत्रित कुटुंबाचे नियोजन करून समाजाला एकीच महत्त्व पटवून देणारे व्यक्तिमत्त्व पैलवान कृष्णा राऊ सासणे (आबा) यांनी केले १०२ वर्षात पदार्पण. गावातील नेते मंडळी, ग्रामपंचायत सदस्य, मित्र मंडळी व ग्रामस्थांनी आबाना शुभेच्छाचा वर्षाव केला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष