कऱ्याप्पा बरगाले यांनी सेवाभावी वृत्तीने केलेले पाणी पुरवठयाचे कार्य उल्लेखनीय : बंडू बरगाले
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
ग्रामपंचायत हेरवाड चे पाणी पुरवठा कर्मचारी कऱ्याप्पा तिप्पाण्णा बरगाले यांनी ३२ वर्षे हेरवाड गावासाठी सेवा वृत्तीने पाणीपुरवठयाचे केलेले कार्य उल्लेखनीय आहे.असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले यांनी केले.ग्रामपंचायत हेरवाडच्या वतीने आयोजित कऱ्याप्पा बरगाले यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की १९९२ पूर्वी टाकळी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा ही ११ गावांची असलेल्या योजनेमध्ये ही केलेले कार्य ही कौतुकास्पद आहे. महापूर व कोरोना सारख्या
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जीवाची पर्वा न करता पाणी पुरवठयाची जबाबदारी सांभाळली. ३२ वर्षाच्या सेवेनंतर दि. ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले त्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला.आघाडीचे नेते, सरपंच,उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा