संयुक्त जय मल्हार ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरढोण येथील संयुक्त जय मल्हार ग्रुपच्या वतीने विविध प्रकारचे व विविध ठिकाणी वृक्षारोपन करण्यात आले."बोलणे जाते विरुनी..अमर राहे सत्कृती" या काव्यपंक्ती प्रमाणे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर जय मल्हार ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वृक्षारोपण करण्यासाठी ११ वृक्षांची रोपे देण्याच्या शब्दानुसार आज श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना रोपवाटीकेतून रोपे देऊन डॉ.कुमार पाटील व सामाजिक कार्यकर्ते अरुण ऐनापुरे यांनी सहकार्य केले.झाडे लावण्यासाठी श्री जय मल्हार ग्रुपच्या वतीने जेसीबी मशीन आणण्यात आले होते.यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद कोरबु,सागर भंडारे , आंदोलक सम्राट विश्वास बालिघाटे, पत्रकार बिरु व्हसपटे, पत्रकार हैदरअली मुजावर,व जय मल्हार बॉईजचे सर्व सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा