संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम



कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केलाजातो. २०२४ ची थीम 'आमचीजमीन, आमचेभविष्य.' याअंतर्गत जमीन पुनर्संचयित करणं, वाळवंटीकरण आणि दुष्काळ या गोष्टींवर भर दिल्याजाणार आहे. पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत लोकांना जागरूक करणं खूप महत्त्वाचंआहे. निसर्गाशिवाय मानवी जीवन या पृथ्वी तलावर राहणार नाही. त्यामुळे झाडं, वनस्पती, जंगलं, नद्या, तलाव, पर्वत, जमीन यांचं महत्त्व समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. विराट गिरी यांच्या हस्ते वृक्षारोपणकरण्यात आले. यावेळी प्रा.एस. एम. डिसोझा, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख, प्रा. अजय कोंगे, प्रा. एस.एन. पाटील, गार्डन विभागाचे कर्मचारी, विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. विराट गिरी म्हणाले पर्यावरणाचे रक्षण करा संपूर्ण मानवजातीचं अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे. प्रदूषणापासून पर्यावरणाचे रक्षण केलं पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण करूनमानवाचा विकास शक्य आहे. सौरऊर्जेचा वापर वाढला पाहिजे. विनाकारण ऊर्जा वाया नघालवण्याची सवय लावायला हवी. पाण्याचा वापर देखील सांभाळून करायला पाहिजे. याशिवाय जलस्रोतांची स्वच्छ ठेवायला पाहिजे. प्लास्टिकचा वापर कमीत कमी करायला हवा. कागदजपून वापरा, वाहनांचावापर कमीत कमी करा. शक्यतो सार्वजनिक वाहतूकीचा वापर करायला हवा. प्रत्येक व्यक्तीने एक रोप लावून संगोपन करणे ही काळाची गरज आहे. वनश्री संजयजी घोडावत हे नेहमीच अशा समाजपयोगी उपक्रमात पुढाकार घेत असतात. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास दोन लाखाहून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचेसंगोपन करून जगवली आहेत.'' संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांतर्गत विविध शासकीय व लोक उपयोगी योजना, माहिती, मार्गदर्शन, प्रशिक्षण, आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी उत्तमरीत्या केले जात आहे. 

संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, संजयजी घोडावत, विश्वस्त श्री.विनायक भोसले यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या आणि वृक्षारोपण कार्यक्रमास सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष