आमदार यड्रावकर यांच्या हस्ते रोपे लावून कृषी पंधरवडा कार्यक्रम संपन्न
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी शिरोळ यांच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने राज्यभर 17 जून ते 30 जून कृषी संजीवनी पंधरवडा कार्यक्रम गावोगावी घेणेत येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाचे औचित्य साधून आज बाबासो बागडी यांच्या धरणगुत्ती मधील शेतावर आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते आंबा रोपे लावून उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी स्वागत तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय आवारे यांनी केले. यावेळी त्यांनी कृषी संजीवनी मोहिमेबाबत माहिती दिली. त्यानंतर सीआरए तंत्रज्ञान वापरून नैसर्गिक रूट झोन पद्धतीने रोप लागवड माहिती कृषि पर्यवेक्षक संजय सुतार यांनी दिली. यावेळी आमदार यड्रावकर यांनी कृषी संजीवनी मोहिमेत जास्तीत जास्त शेतकरी यांनी सहभाग होऊन नव - नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी बाबासो बागडी तसेच कृषी पर्यवेक्षक संपतराव मुळीक, कृषी सहाय्यक सचिन कोळी, सीमा खारकांडे व इतर शेतकरी उपस्थित होते. आभार कृषी सहायक प्रशांत राजमाने यांनी मानले.
यावेळी आप्पासाहेब पाटील, संजय चौधरी, सुनील गाडीवडर, इब्राहिम मोमीन, विशाल कांबळे, आकाश कुरणे, संजय बोरगावे, अशोक ऐनापुरे, शंकर चव्हाण, देवाप्पा चव्हाण असिफ मोमीन यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा