राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची देशाला गरज : सरपंच रेखा जाधव



हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 समाजामध्ये जातीभेदाच्या भिंती पाडण्यासाठी शाहू महाराजांनी निरनिराळे प्रयत्न केले. राजर्षी शाहू महाराज स्वतः कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानत नव्हते. अशाप्रकारे कोल्हापूर संस्थानात शिक्षण, सामाजिक प्रबोधन, सर्वसामान्य माणसांचा विचार करणारा राजा, पुरोगामी विचार जोपासणारा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचे भारताच्या इतिहासामध्ये खूप मोठे स्थान आहे. त्यामुळे अशा राजांच्या विचाराची देशाला गरज आहे. असे प्रतिपादन सरपंच रेखा अर्जुन जाधव यांनी केले. 

राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हेरवाड ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिमापूजन, वृक्षारोपण, दहावी बारावी मधील गुणवंतांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

  प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच परिषदेचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार अक्काताई अकिवाटे यांना मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. जयंतीच्या औचित्य साधून येथील माळ भागातील कुमार शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 

याप्रसंगी उपसरपंच दयानंद पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य, अर्जुन जाधव, तंटामुक्त अध्यक्ष सुभाष देबाजे , माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबुराव माळी व गिरीश पाटील, बाबासो नदाफ, जमीर मुल्ला, ब्रिजेश पाटील, माजी सरपंच चंद्रकला पाटील , वैशाली पाटील, अंगणवाडी सेविका, आशाताई यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष