औरवाडला उद्या श्री अमरेश्वर मंदिर शताब्दीमहोत्सव
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
औरवाड (ता.शिरोळ) येथील श्री अमरेश्वर मंदिराच्या शताब्दीमहोत्सवानिमित्त शुक्रवार दि.२८ जुन रोजी विविध धार्मिक,अनुष्ठान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. औरवाड येथे श्री दत्त भक्तांचे श्रद्धास्थान असलेले पुरातन असे जागृत देवस्थान मानले जाणारे श्री अमरेश्वराचे मंदिर आहे.
या मंदिरात सदगुरु श्री दिक्षित स्वामी महाराज यांनी स्थापित केलेल्या श्री दत्त अमरेश्वर,श्री योगिनी माता,श्री महागणपती व अन्य देवता स्थापनेस शंभर वर्षे पुर्ण झाली आहेत. यानिमित्त शुक्रवारी विविध धार्मिक अनुष्ठान होणार आहेत.
यामध्ये सकाळी सहा वाजता काकड आरती व षोडोपचार पुजा होईल.सकाळी सात वा.दत्तयाग व पुर्णाहुती होईल. सकाळी दहा वा. महापुजा,दुपारी बारा वा.आरती व नैवेद्य होईल.यानतंर महाप्रसाद होईल. सांयकाळी चार वा.जगदगूरु करवीर पिठाधीश विद्या नृसिंहभारती शंकराचार्य यांचे आशीर्वाचन होईल. सांयकाळी पाच वा.श्री वासुदेव बुवा जोशी (औदुंबर) यांचे सुश्राव्य किर्तन होईल. रात्री आठ वा.धुप,आरती,व पालखी सोहळा होईल. सर्व धार्मिक कार्यक्रमांचा दत्तभक्त,भाविक,सेवेकरी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा