बोरगाव येथे अरिहंत सभागृहात दिनांक २९ जून रोजी सकाळी ११ वाजता श्रध्दांजली सभेचे आयोजन

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

          बोरगाव येथील दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष व अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, सहकार रत्न, आमच्या संस्थेचे आधारस्तंभ व मार्गदर्शक श्रावक रत्न श्री रावसाहेब आनगोंडा पाटील यांचे दिनांक २५ जून २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. अरिहंत उद्योग समूहाच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक २९ जून रोजी सकाळी ११ वाजता श्री अरिहंत सभागृह या ठिकाणी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी बोरगाव सह परिसरातील अरिहंत शी निगडित असणाऱ्या सर्व संस्थांचे संचालक ,कर्मचारी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. स्वर्गीय, सहकार रत्न रावसाहेब पाटील दादा यांनी १९९० साली बोरगाव या खेड्यात श्री अरिहंत क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातुन छोटसं रोपट लावून परिसरात सहकार्याची मुहूर्त मेढ उभी केली होती. आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले दिसत आहे. यामध्ये श्री अरिहंत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव मल्टीस्टेट, विविध उद्योशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ निमित्त बोरगाव, श्री अरिहंत रुरल डेव्हलपमेंट सोसायटी बोरगाव, श्री अरिहंत शुगर इंडस्ट्रीज, श्री अरिहंत हॉस्पिटल बेळगाव, श्री अरिहंत सुतगिरणी, अरिहंत दूध उत्पादक संघ,श्री अरिहंत महिला गारमेंट, श्री अरिहंत कृषी सेवा केंद्र, श्री अरिहंत रास्त भाव दुकान अशा अनेक संघटना निर्माण झाल्या आहेत. अरिहंत उद्योग समूह संबंधित सर्व संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी ,संचालक मंडळ यांनी 29 जुन रोजी सकाळी अकरा वाजता श्री अरिहंत सभागृह या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात उपस्थित रहावे.     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष