मन, बुध्दी, शांती जीवनासाठी योगा अंगीकारणे ही आज काळाची गरज : मुख्याध्यापक आर. एम.पकाले

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

  शालेय जीवनात विद्यार्थ्याना विविध कला जोपासना बरोबर योगाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा व धगधगत्या जीवनात विद्यार्थ्याना मोबाईल बरोबर मन, बुध्दी, शांती मिळवण्यासाठी योगा शिक्षण घेणे गरजेचे आहे. असे मत पी एम श्री मराठी सरकारी प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक श्री पकाले यांनी केले.ते आयोजित आंतर राष्ट्रीय योगा दीन कार्यक्रम दरम्यान बोलत होते. २१ जून हा आंतर राष्ट्रीय योगा दीन निमित्ताने बोरगांव येथील अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळेत योगा दिन साजरा करण्यात आला. यामध्ये श्री विद्यासागर शिक्षण संस्था, के एस पाटील हायस्कूल, श्री अरिहंत रुरल डेव्हलोपमेंट संचलित सर्व शाळा, अहिंसा इंग्लीश मिडीयम स्कूल, सरकारी प्रायमरी शाळेत आंतर राष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला.  भारतात प्राचीन काळापासून योग कला अस्तित्वात आहे. विविध साहित्य, शालेय पाठ्य पुस्तकात देखील योगाचे महत्त्व सांगण्यात आले आहे, योग कला ही भारतीयांना मिळालेली एक पर्वणी आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण बरोबर योग कला आत्मसात करावी, असे आवाहन बोरगांव येथील आयोजित योगा कार्यक्रमात सांगण्यात आले.                  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष