आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार आनंदा शिंगे यांना प्रदान
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा परिषद मार्फत दिला जाणार आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार शिरटी (ता. शिरोळ) येथील जेष्ठ पत्रकार आनंदा शिंगे यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आनंदा शिंगे यांनी गेली चार तपे पत्रकार क्षेत्रात स्वतः ला झोकुन देऊन काम करीत आहेत. त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून नागरिकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल कोल्हापूर जिल्हा परिषद यांनी घेऊन जिल्हास्तरीय नामांकित आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, शिल्पा पाटील, माधुरी परीट, मुख्य लेखाधिकारी अतुल अकुर्डे, कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर, शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, मीना शेंडकर, जिल्हा पशुवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .राजेश गायकवाड आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा