रुई च्या सुतार बंधूचीं माणुसकी व दातृत्वाची ईद
हातकणंगले / शिवार न्यूज नेटवर्क :
इस्लाम धर्मियांच्यात बकरी ईद निमित्त कुर्बानी किंवा आपल्या कमाईतील काही भाग दान करण्याची प्रथा आहे. समाजातील गोरगरिबांना आपल्या कमाईतील काही भाग दान देण्याची शिकवण दिली जाते. रमजान ईद व बकरी ईद या पवित्र सणानिमित्त अनेक जण दानधर्म करीत असतात. त्यातील रुई ता.हातकणंगले येथील जावेद सुतार व फारुख सुतार या भावंडांनी कन्या विद्या मंदिर रुई या शाळेतील १२५ विद्यार्थ्यांना ४० डझन वह्यांचे वाटप करून माणुसकीची व दातृत्त्वाची ईद साजरी केली. त्यांच्या या आदर्शवत कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.याप्रसंगी सरपंच शकीला कोन्नूर, उपसरपंच अशोक आदमाने,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सर्फराज मकुभाई,छाया साठे,शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा