लाल बहाद्दुर विद्यालय कवठेगुलंदमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा



अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

कवठेगुलंद( ता.शिरोळ )येथील लालबहाद्दूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी नियमित योगाने शरीर निरोगी बनते,शरीराची उर्जा वाढते,जीवन आनंदी बनते.अशाप्रकारे योगाचे महत्व विषद करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाने सन २०१५ पासून जगभरात २१ जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. 

यानुसार विद्यालयात दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. व्ही.आर. नाईकसनदी यांनी विद्यार्थ्यांना योग साधनेचे महत्व सांगितले. ते म्हणाले, योगसाधनेचे मूळ उगमस्थान आपला देश आहे. संपुर्ण जगाला योगाचे महत्व पटले आहे,मात्र आपल्या देशातील आबालवृद्धांना याचे महत्व पटवुन देणे ही काळाची गरज बनली आहे. २१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योगविषयीचे ज्ञान जगासमोर आणले. योगाचे महत्व जगाला पटले आहे.यामुळे २१ जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. यानुसार आजच्या योगदिनानिमित्त विद्यालयातील सर्व शिक्षकासह विद्यार्थ्यांनी शारीरिक व्यायाम, व योगासनांचे विविध प्रकार केले. 

  विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्रीनिवास बुरुटे यांनी योगाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना करून दाखवली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एल.सी.चौरे , पर्यवेक्षक श्री.आर डी खामकर आणि विद्यालयातील सर्व सहाय्यक शिक्षक विद्यार्थी या सर्वांनी प्रत्यक्षरित्या योगा करण्यात सहभाग घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष