'शरद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांकडून पपई जामचे प्रात्यक्षिक'
हिंगणगाव / शिवार न्यूज नेटवर्क :
जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी हिंगणगाव येथे त्यांच्या ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत "पपई पासून जाम तयार करण्याचे प्रात्यक्षिक" करून दाखविले. यावेळी कृषी कन्यांनी हिंगणगाव मधील महिलांना पपई फळापासून दीर्घकाळ टिकणारे जाम बनविण्याची कृती प्रात्यक्षिक रूपाने दर्शविली.
यावेळी महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना कृषीकन्यांनी समर्पक उत्तरे दिली व त्याच्या सर्व शंकांचे निरसन केले. यावेळी कृषी कन्या मृण्मयी धनगर,काजल डोंबाळे, अर्पिता कोरे, स्नेहल पाटील व साक्षी वर्णे उपस्थित होत्या.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस.आर. कोळी, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन प्रा.एस.एच. फलके, कार्यक्रम समन्वयक डॉ.आर.टी. कोळी, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.एस. माळी, विद्यार्थिनी समन्वयक प्रा.आर. एम.पाटील व एस.व्ही. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा