ढोणेवाडी कारदगा परिसरातील यंत्रमाग धारकांचा वाढीव वीजबिल साठी एल्गार
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कर्नाटक राज्य सरकारने दहा एचपीसाठी मोफत वीज दिली आहे .पण थकीत बिले माफ न करता पुन्हा यंत्रमाग धारकांना बील भरण्याची नोटीस येत आहेत.त्यामुळे संतप्त यंत्रमाग धारक मोर्चा काढून एल्गार केला आहे.
यावेळी बोलताना भीमराव खोत म्हणाले की, राज्य सरकारने वाढीव वीज माफ करण्यासाठी राज्य अध्यक्ष शिवलिंग टिरकी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असुन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन दिले आहे. सध्या मिटरला २ रुपये ४३पैसे मजुरी असुन खर्च मात्र ३ रुपये ६३ पैसे येत आहे. ५२ पिकाला ५ पैसे ऐवजी ७ पैसे मजुरी मिळाल्यानंतर हा व्यवसाय टिकणार आहे.नाहीतर वाढीव विज बिले व जाचक अटींमुळे हा व्यवसाय डबघाईस जाणार आहे तरी शासनाने वाढीव थकीत बील करुन यंत्रमाग व्यवसायास उर्जितस्थेत आणावे असे म्हणाले.
त्यानंतर सद्गुरू आप्पा महाराज मठापासून मोर्चा काढुन भोज हेस्काॅमला महालक्ष्मी यंत्रमाग सोसायटीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी आण्णासाहेब नागराळे,सोमनाथ परकाळे, बाळासाहेब लायकर बाबासाहेब हंडे ,दादासो खामकर संतोष संकपळ,, राजु बेनाडे, मारुती संकपळ,राहुल घाटगे , सतीश नागराळे आजी मान्यवर व यंत्रमाग धारक उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा