कुरुंदवाडात नव्या कायद्यांच्या जनजागृतीसाठी शनिवारी रॅली: सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस



कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

     केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन तीन कायद्यांत बदल करून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय सक्षम कायदा असे नवीन तीन कायदे केले आहेत.तर 20 नव्या गुन्ह्यांच्या शिक्षेतही बदल केला आहे.या कायद्यांची १ जुलै पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.या कायद्याची जनजागृती करण्यासाठी शनिवारी सकाळी ९ वाजता शहरातून नवीन कायद्या जनजागृती रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती स.पो.नि रविराज फडणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      पत्रकार परिषदेत पुढे बोलताना सपोनि फडणीस म्हणाले महिला लैगिक अत्याचार प्रकरणातील दोषी आढळणाऱ्या आरोपीला २० वर्षांचा कारावास किंवा जिवंत असेपर्यंत तुरुंगवास,बाल लैगिक अत्याचारात दोषी आढळणाऱ्या आरोपीला जन्मठेप आणि फाशीची शिक्षा असा मोठा बदल केला आहे.तर खुनाचे कलम ३०२ हे आता कलम १०१ असे बदल करण्यात आले आहे.तसेच २० नव्या गुन्ह्यांमध्ये आणि त्याच्या शिक्षेतही बदल करण्यात आला आहे.

     माहिती देताना सपोनि फडणीस पुढे म्हणाले भारतीय दंड संहिता,फौजदारी प्रक्रिया संहिता,पुरावा कायदा या जुन्या कायद्यात बदल करण्यात आला आहे.हे नवीन कायदे १ जुलै २०२४ पासून लागू होतील, अशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील प्रमुख मार्गावरून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे महाराणा प्रताप चौकात या रॅलीचा समारोप होईल समारोप ठिकाणी नवीन कायद्यांचीपुस्तिका त्या ठिकाणी वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष