ढोणेवाडी येथे बंद घराचा कडी कोयंडा तोडून ६ लाखाचा ऐवज लंपास
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी येथे अज्ञात चोरट्यानी दुपारी बंद घराचे कडी तोडून सुमारे सहा लाख किमतीचे सोने व इतर किमती वस्तू लंपास केल्या आहेत. या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळा वरुन मिळालेली अधिक माहिती अशी की ढोणेवाडी येथील मल्लु सदाशिव घाटगे यांचे ढोणेवाडी रेंदाळ रस्त्यावर खडके माळ येथे घर आहे. मल्लु घाटगे हे इचलकरंजी येथे शिक्षक असुन त्यांच्या पत्नी ढोणेवाडी येथील सरकारी मराठी शाळेत अतिथी शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. काल गुरुवार दि.२७रोजी दोघेही पती पत्नी नोकरीस गेले होते. घरी आई कमल घाटगे एकटीच होत्या.त्याही दरवाज्याला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या .काही वेळाने त्या घरी आल्यावर मागील घराचा दरवाजा उघडलेला दिसला .त्या आत येवुन पाहिल्या तर तिजोरी उघडुन त्या मधील कपडे विखुरलेल्या अवस्थेत पडलेले होते.त्यानी तात्काळ. मराठी शाळेत शिक्षिका असलेल्या सुनेला घरी बोलावले.सूनेने घरी येवुन पाहिले तर तिजोरीतील सामान इतरत्र पडले होते.त्यानी तिजोरीतील घंटन, मनी मंगल सूत्र, बोरमाळ, लहान मुलांचे सोन्याचे मनगट पाहिले तर दागिने नव्हते . सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने व दोनशे ग्रॅम चांदी आसा चालु भावाने सुमारे सहा लाख किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. घाटगे व त्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती समजताच सदलगा पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे. या वेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले पण ते घराभोवती घुटमळले . ठसे तज्ञ यांनीही हाताचे ठसे घेतले असुन पुढील तपास सदलगा पोलीस ठाण्याचे पदाधिकारी करीत आहेत. सदर घटनेची नोंद मल्लु घाटगे यांनी सदलगा पोलीस ठाण्यात केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा