कुस्तीपटू गौरी पुजारी हिचे अकस्मिक निधन

 


शिरोळ तालुक्यातील २४ वर्षीय कुस्तीपटू गौरी पुजारी हिचे आज अकस्मिक निधन झाल्याने तेरवाड , कुरुंदवाड परिसरात शोककळा पसरली आहे.

शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील राष्ट्रीय पातळीवरील २४ वर्षीय महिला कुस्तीपटू गौरी उर्फ विनया सुभाष पुजारी हिचे आकस्मित दुःखद निधन झाल्याने कुस्ती क्षेत्रात मोठी पोकळी झाली असल्याचे मत कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे. 

गौरी पुजारी ही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुस्तीपटू होण्याचे स्वप्न बाळगून होती. गौरीचे प्राथमिक शिक्षण तेरवाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण कुरुंदवाड येथे झाले होते. मुळातच कुस्तीचे बाळकडू तिला घरातूनच तिचे चुलते नंदू आणि सुनील पुजारी यांच्याकडून मिळाले होते. गौरीने ऑल इंडिया चॅम्पियनशिप, म्हैसूर केसरी, महाराष्ट्र चॅम्पियनशिप, बहुचर्चित आमिर खान यांच्या दंगल चित्रपटांमध्ये कुस्तीपटू म्हणून विशेष सहभाग घेतला होता. महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद या ठिकाणी ती सराव करत होती. त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट स्पोर्ट्स पंजाब येथील पटियालामध्ये कुस्ती प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती. अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रामध्ये भरारी मारलेल्या गौरीच्या जाण्याने तेरवाड आणि कुरुंदवाड परिसरातील कुस्ती क्षेत्रातील खेळाडूंमध्ये ही बाब नक्कीच मनाला चटका लावणारी आहे. तिच्या जाण्यानं कुरुंदवाड परिसरातील कुस्ती तालम्यांची तांबडी माती पोरकी झाल्याचे दिसत आहे. तेरवाड येथे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी राजकीय शैक्षणिक आणि कुस्ती क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष