राजर्षि शाहू विद्या मंदिरात शाहू जयंती उत्साहात

  


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

     बहुजनांच्या सर्वांगिण उध्दारांसाठी कार्य करणारा लोकराजा राजर्षि शाहू महाराज जयंती राजर्षि शाहू विद्या मंदिर शिरोळ नं.१ शाळेत उत्साहात संपन्न झाला.

          शाहूराजांच्या वेशभूषेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले.प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनिल कोळी यांनी केले.प्रतिमा पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक फल्ले व सदस्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

        सौ.सिमा शिंदे,विजय खातेदार यांच्यासह विद्यार्थ्यांनी शाहूंच्या कार्यासंबंधी मनोगत व्यक्त केले.मनोगत व्यक्त करणाऱ्या व वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांना वहया वाटप करुन प्रोत्साहन देण्यात आले.

         याप्रसंगी राजेश संकपाळ, सुप्रिया गावडे,श्रध्दा कुन्नुरे, संजीवनी चुडमुंगे,मोहिनी कांबळे,विमल वर्धन,सुनंदा पाटील,नसीम शिकलगार, सुमित्रा कोळी,भारती इंगळे, बाळासो कोळी उपस्थित होते. सूत्रसंचलन दिपक वावरे तर आभार रमजान पाथरवट यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष