शरद इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल, इलेकट्रीकलच्या ३२ विद्यार्थ्यांची जेबीएम ग्रुपमध्ये निवड
यड्राव / शिवार न्यूज नेटवर्क :
यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागातील ३२ विद्यार्थ्यांची जेबीएम ग्रुप या नामांकित कंपनीत निवड झाली.
यामध्ये मेकॅनिकल विभागातील प्रज्ञा धुमाळ, अदिनाथ उमरानी, पवन व्यास, प्रथमेश कोळके, सोयब मुल्ला, वैभव कागले, भार्गव जोशी, अभिषेक पाटील, रोहन महाजन, अथर्व माळी, अभिजित गोंधळी, कौस्तुभ गुमाने, श्रीवरहन कोळी, इलेक्ट्रीकल विभागातील प्राजक्ता घोरपडे, केदार पुरी, अमृता ढोकरे, ऋतुजा आवटे, वैष्णवी कोळी, विश्वजित यादव, रोहन पाटील, विशाल उगरे, अशुतोष कांबळे, अश्विनी घवाले, तेजस्विनी कदम, मेहबूब अत्तार, ऋतुजा कोळी, प्रथमेश गायकवाड, सारिका कोळी, प्रथम मगदूम, विनोद पाटील, समीना मखमल्ला, सिमरन तबरेज या विद्यार्थ्यांची निवड झाली.
जेबीएम समूह हा २.६ बिलियन डॉलरचा जागतिक समूह असून जगभरातील १० देशांमध्ये २५ पेक्षा जास्त ठिकाणी कार्य करतो. कंपनी प्रमुख ऑटो सिस्टीम, इलेक्ट्रिक वाहने आणि बसेसच्या जगातील आघाडीच्या उत्पादकांपैकी आहे. तसेच ऑटो घटक आणि प्रणाली, ईव्ही इकोसिस्टम, इलेक्ट्रिक वाहने आणि बसेस, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, अक्षय ऊर्जा, पर्यावरण व्यवस्थापन उपाय, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध विभागांमध्ये काम करत आहे
महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्ऩिकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यु यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीपीक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. प्रथम वर्षापासून प्रोजेक्ट व प्रशिक्षण या सर्वांचा उपयोग मुलाखतीवेळी झाला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. नेहा सोनी, प्रा. अभिजित केकरे यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा